"Welcome to All Super Arts, your ultimate destination for all things creative! Dive into a world where imagination knows no bounds. Whether you're an aspiring artist seeking inspiration, a seasoned creator looking to refine your craft, or simply an art enthusiast eager to explore diverse expressions, we've got you covered. Our blog is a treasure trove of insights, tutorials, and features spanning a myriad of artistic disciplines.
Monday, February 17, 2020
बाप कुठे काय करतो?
तो तर काय घराबाहेरच असतो. सकाळी निघतो, धक्के खात कामावर जातो, संध्याकाळी थकून घरी येतो. घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो… इतकंच?यात काय विशेष? बाप कुठे काय करतो?शाळेची फिस, घरचा महिन्याचा किराणा, लाईटबिल, फोनबील…सगळं मॅनेज करतो. महिनाअखेरीस पाय ओढत घराकडे येतो. घर चालवण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो, ती कशीतरी फेडतो… पण बाप कुठे काय करतो?
मुलांच्या दुखण्याखुपण्यावर अस्वस्थ होतो. कुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित, पण रात्रभर तो ही जागा राहतो. म्हाताऱ्यांची आजारपणे, हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो. स्वतःची दुखणी मात्र अंगावरच काढतो. पण त्याला कोण विचारतो? कारण असंही बाप कुठे काय करतो?
कुटुंबासाठी लढतो, कधी जिंकतो कधी हारतो. लढाईत झालेल्या जखमांना अलगद लपवतो. कुटुंबासमोर हसतो. पुरुष आहे ना तो? त्याला रडण्याची परवानगी कुठे? सर्व प्रसंग आनंदाने साजरे करून तो मात्र मनातच कुढतो. छ्या राव… बाप कुठे काय करतो?🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
Sunday, February 16, 2020
Subscribe to:
Posts (Atom)




